E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्या
Wrutuja pandharpure
23 May 2025
तपास सीआयडीकडे सोपवा; प्रशांत जगताप यांची मागणी
पुणे
: अटक करा अटक करा राजा हगवणेला अटक करा....मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या... अशा घोषणा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन केले. वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकाराचा तपास सीआयडीमार्फत करून फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवले जावे, अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे.
सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, हे प्रकरण राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून धरले असून गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, राजा हगवणे व त्याचा मुलगा शशांक हगवणे घेण्याबोरकरणी दोषी असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पळून जाण्यास मदत केली.
हे दोघे कोळवळ खोर्यात लपून बसले असून त्यांना पकडण्यासाठी पथके देखील पटवण्यात आलेली नाही, असा आमचा थेट आरोप आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला वैष्णवीचा मर्डर कधी होणार आहे हे माहिती असताना देखील त्याच्या व हगवणेच्या घरात अर्ध्या तासांचे अंतर असताना देखील वैष्णवीचा मृतदेह दवाखान्यात गेल्यावर तिचे बाळ पळवल. ही बाब लक्षात आल्यावर माध्यमांनी दबाव आणल्यावर चव्हाण याने हे बाळ परत केले, त्यामुळे ही घटना प्री प्लॅन होती. त्यामुळे नीलेश चव्हाण व हगवणे कुटुंबीयांचे सीडीआर तपासण्यात यावे ही आमची मागणी आहे.
या प्रकरणी सर्वांवर मकोक लावण्यात यावा व हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी सरकारची नियत साफ आहे हे या माध्यमातून सिद्ध करावे व फडणवीस यांनी या राज्याची माफी मागावी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
सुनील तटकरेंकडून बचाव
राजा हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय नेता होता. ती मुळशीसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सक्रीय सहभागी होता. त्याचा मुलगा शशांक हगवणे हा सुद्धा राष्ट्रीय युवक काँग्रेसचा सक्रिय सदस्य होता. याचे पुरावे याच्या कडे आहे तसेच हे जाहीर असताना ज्येष्ठ नेते व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे हगवणेचा बचाव करताय हे दुर्दैव म्हणावे लागेल अशी टीका जगताप यांनी यावेळी केली.
कोणत्याही लग्नात जाता आता विचार करावा
वैष्णवी व शशांक यांच्या लग्नात अजित पवार स्वतः हजर होते. त्यांच्या हस्ते मोटारीची चावी देण्यात आली. पवार यांनी जरी चावी दिली असली तरी त्यांना त्यामागचे सत्य माहिती नसावे ते या प्रकारच्या प्रवृत्तींना चालना देखील देणार नाहीत. मात्र, या पुढे त्यांनी कोणत्याही लग्नात जातांना काळजी घ्यावी,असा टोला देखील प्रशांत जगताप यांनी लगावला.
Related
Articles
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : स्मृती मंधाना
06 Jun 2025
विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर
04 Jun 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : स्मृती मंधाना
06 Jun 2025
विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर
04 Jun 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : स्मृती मंधाना
06 Jun 2025
विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर
04 Jun 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेचा कालावधी केला कमी
06 Jun 2025
महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : स्मृती मंधाना
06 Jun 2025
विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर
04 Jun 2025
भाजपच्या आणखी २२ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर